Search This Blog

Sunday, June 19, 2016

एक मैत्रिण मलाही आहे...

एक मैत्रिण मलाही आहे... 

एक मैत्रिण मलाही आहे.... 
एक मैत्रिण मलाही आहे.. 

एक मैत्रिण मलाही आहे..
इतरांना असते तशीच... किंवा त्याहून थोडीशी वेगळी... 
थोडी अल्लड, थोडी अवखळ,
थोडी लाजरी, थोडी बुजरी,
थोडी जास्तच बडबडणारी... 
थोडी गप्प राहणारी..... 
इतरांसारखीच... पण थोडी वेगळी.. जराशी वेंधळी... 
एक मैत्रिण मलाही आहे.. 

एक मैत्रिण मलाही आहे..  
कधी खळखळून हसणारी, कधी मुसमुसून रडणारी. 
आलंच कधी मनात तर भडभडून बोलणारी,
नाहीतर मग गप्प होऊन जाणारी. कधी हाडकणारी, तर कधी खुद्कन हसणारी
इतरांसारखीच... पण थोडीशी  वेगळी..... 
एक मैत्रिण मलाही आहे..


एक मैत्रिण मलाही आहे..
एखाद्या नितळ वाहणाऱ्या झऱ्यासारखी खळखळ,
तर कधी खोल डोहासारखी नि:शब्द ...
शांत असली तर मंजुळ वारा,
आणि रागावली कधी  तर घोंगावणारं वादळ असणारी...

इतरांसारखीच... पण थोडीशी  वेगळी..... 
एक मैत्रिण मलाही आहे..


एक मैत्रिण मलाही आहे..
प्रेमाने भरभरून कौतुक करणारी,
हक्काने  कधी चुकलं तर कान धरणारी,
कधी चिडनारी तर कधी चिडवणारी,
लटक्या रागाने कधी 'दुष्ट' म्हणणारी..
मग सगळं विसरून हळूच खुद्कन हसणारी...
इतरांसारखीच... पण थोडीशी  वेगळी..... 
एक मैत्रिण मलाही आहे..

एक मैत्रिण मलाही आहे..
वाटलंच कधी एकटं, केलं कधी जगाने परकं,
तर मायेने आपलंसं करणारी,
पोरक्या झालेल्या मनावर ममतेचं पांघरून घालणारी.
मनात उठलेल्या वादळाला शांत करणारी
भळभळणाऱ्या जखमेवर हळुवार फुंकर घालणारी...
इतरांसारखीच... पण थोडीशी  वेगळी..... 
एक मैत्रिण मलाही आहे...

एक मैत्रिण मलाही आहे..
नात्यांना बांधून ठेवणारी,
सर्वाना आपलंसं करून घेणारी
राग, द्वेषाचा लवलेशही नसलेली
आहे त्या परिस्थितीत जगायचं कसं
हे माहीत असणारी...
इतरांसारखीच... अंहं... पण थोडीशी  वेगळी..... 
एक मैत्रिण मलाही आहे...