Search This Blog

Friday, March 2, 2018

अजुन थोडा वेळ !!!

अजुन थोडा वेळ !!!

एकदाच तुला शेवटच भेटायच होत,
या डोळ्यांत तुला भरून घ्यायच होत,
तुला शेवटच येताना पहायच होत,
अजुन एकदा वाट पाहण अनुभवायच होत,
तुला भेटल्यावर होणारा आनंद अनुभवायचा होता,
थोडा वेळ तुझ्याकड पहात रहायच होत,
तुझ्या डोळ्यांत हरवून जायचं होतं,
थोडा वेळ तुझ्याशी बोलायच होत,
तुला खुप काही सांगायच होत,
तुला काही तरी बोलतानाही एेकायच होत,
तुझ्या आवाजात माझ नाव एेकायच होत,
अजुन थोडा वेळ तुला थांबवायच होत,
मागे वळत तुला जाताना पहायच होत,
जाताना तुझी होणारी तगमग अनुभवायची होती,
अजुन थोडा वेळ स्वप्नात जगायच होत,

एकदाच तुला ....
एकदाच तुला शेवटच भेटायच होत,
आणि तुझं प्रेम परत एकदा अनुभवायचं होतं,
अजुन थोडा वेळ स्वप्नात जगायच होत,
अजुन थोडा वेळ !!!